Ad will apear here
Next
‘आँको लाइफ’तर्फे मौखिक कर्करोग दिन साजरा
आँको लाइफ कॅन्सर सेंटरतर्फे मौखिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित नागरिक.

सातारा : शेंद्रे येथील आँको लाइफ कॅन्सर सेंटरतर्फे मौखिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून २७ जुलै रोजी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मौखिक कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी रुग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक विभाग, दंत विभाग आणि कर्करोग प्रतिबंध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिराचे आयोजन केले होते.

या प्रसंगी रुग्णालयाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उदय देशमुख, कर्करोग प्रतिंबध विभागाचे प्रमुख डॉ. अर्जुन शिंदे, कर्करोग शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मनोज लोखंडे  रेडीएशन तज्ञ डॉ. करण चंचलानी व दंत विभागाचे प्रमुख डॉ. नकुल परशरामी यांच्यासह रुग्ण, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हॉस्पिटलच्या समुपदेशक निलम राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
समाजात कर्करोगाविषयी अनेक गैरसमज असल्याने कॅन्सर हा शब्द ऐकल्यावर अनेकदा रुग्णांचे मनोबल ढासळते. म्हणूनच आँको लाइफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती व रुग्ण प्रबोधन व्हावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते. अत्याधुनिक उपाचार पद्धती व अद्ययावत तंत्रज्ञानाची सांगड घालत उपचार उपलब्ध करून देण्याचा सेंटरचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.
 
या प्रसंगी दंतरोग तज्ञ डॉ. परशरामि यांनी १००हून अधिक नागरिक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मोफत मौखिक तपासणी केली. या वेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी कॅन्सरविषयी, तसेच त्यांना ‘आँको लाइफ’द्वारे दिलेला विश्वास व उपचारपद्धतीचा विशेष दाखला देत डॉक्टरांप्रती सद्भावना व्यक्त केली.

डॉ. मनोज लोखंडे यांनी मौखिक कर्करोगविषयी काही ठळक मुद्दे अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वत:ला मुक्त केले, तर नक्कीच तोंडाचा कर्करोग होण्यापासून स्वत:चे रक्षण करू शकतो; तसेच कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळ वाया न घालवता योग्य डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZIMBQ
Similar Posts
सातारा जिल्ह्यात महिलेवर यशस्वी ब्रॅकीथेरपी सातारा : येथील ऑन्को लाइफ सेंटरमध्ये डॉ. करण चंचलानी यांनी अत्याधुनिक ब्रॅकीथेरपीचा वापर करून अवघ्या एका आठवड्यात स्तनांचा कर्करोग असलेल्या ६६ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार केले.
ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरला ‘इंडियन अचिव्हर्स’ पुरस्कार सातारा : आरोग्य क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत अद्ययावत उपचारपद्धतींसह ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त करून रुग्णांना अधिकाधिक उत्तम आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरला बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॅन्सर हॉस्पिटल म्हणून ‘इंडियन अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
‘आयपीसी’तर्फे मोफत तपासणी शिबिर पुणे : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरतर्फे (आयपीसी) सहा ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरबाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण रेठरे बुद्रुक (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कराडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला कराड तालुका कृषी अधिकारी दत्तत्रय खरात, वाळवा तालुका उपविभागीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language